85305 84532 | 98210 87115
info@saveoursahyadri.net

प्रकल्पा विषयी

संस्थेबद्दल माहिती

Center for Sustainable Development - शाश्वत विकास केंद्र. 1930 मध्ये स्थापन झालेली गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था, पुणे, ही भारतातील एक अग्रगण्य संशोधन संस्था आहे. सध्याच्या पर्यावरणीय समस्या आणि त्या साठी राबवण्यात येणारी केंद्र व राज्य सरकारची धोरणे आणि अहवाल पाहणे व त्यावर सल्लात्मक उपाय सुचवणे या हेतूने सन २०२२-२०२३ रोजी शाश्वत विकास केंद्राची स्थापना करण्यात आली. आमचे प्रकल्प क्षेत्र शास्वत ग्रामविकास,पर्यावरण संवर्धन, जल संवर्धन, घन कचरा व्यवस्थापन, पर्यावरणीय सेवांचे मूल्यवर्धन आणि संवर्धन, हरित ऊर्जा, कार्बन मूल्यांकन,सागरी परिसंस्था संवर्धन.

आमची उद्दिष्टे
१. सामाजिक आणि पर्यावरणीय समस्या समजून घेणे आणि त्यावरील उपाय योजना निर्मितीमध्ये योगदान करणे.
२. पर्यावरणीय सेवा आणि नैसर्गिक संसाधनांच्या मूल्यांकनाचे मार्ग विकसित करणे.
३. हवामान बदलाच्या दुष्परिणामांना सामोरे जाण्यासाठी स्थानिक संदर्भ आणि विविधते वर आधारित कृती आराखडे तयार करणे.
४. शासनाच्या हवामान बदल कृती आराखड्याकहा वेळोवेळी आढावा घेणे.
५. संस्थे मार्फत विविध स्तरांवर पर्यावरण आणि पर्यावरणीय अर्थशास्त्राचे अभ्यासक्रम कार्यान्वित करणे.

प्रकल्पा बद्दल

    सह्याद्रीतील नैसर्गिक साधन संपत्तीचा दिवसेगणिक ह्रास होत आहे तयामुळे स्थानिक राहिवाशांचे उपजीवविके साठी स्थलांतर होत आहे. या दृष्टचक्राला भेदणाऱ्या “संघटन, संवर्धन, मूल्यवर्धन” या त्रिसूत्री चा प्रचार आणि प्रसार करणे हे या प्रकल्पाचे ध्येय आहे.

    प्रकल्पाची उद्दिष्टे:

  • सह्याद्रीतील निसर्ग संपदेचे संवर्धन आणि शास्वत व्यवस्थापनाचे महत्व समजावून सांगणारी जनजागृती मोहीम उभारणे आणि सातत्याने चालवणे.

  • स्थानिक राहिवाशांशी (प्रामुख्याने तरूणांशी) विविध प्रकारे संवाद साधून त्यांचा मनात सह्याद्रीचे संवर्धन आणि स्थानिकांची दीर्घकालीन समृद्धी , या दोन्हींचा संबंध स्पष्ठ करणे.

  • ३. सह्याद्रीतील तरुणांना व्यवसायाचे ठोस पर्याय सुचवणे ज्या मार्फत त्यांना

    • स्थानिक कायम स्वरूपी नोकरीच्या संधी मिळतील.
    • आर्थिक स्थिरता मिळेल आणि
    • परिसरातील नैसर्गिक साधनांचा शहाणपणाने शाश्वत उपयोग करून खरी समृद्धी मिळू शकेल.

आमची टीम

निखिल अटक

सहाय्यक संशोधक, शास्वत विकास केंद्र,
गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था, पुणे.

नितीन राऊत

प्रकल्प सहाय्यक, शास्वत विकास केंद्र,
गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था, पुणे.